वीस ग्रामपंचायतीवर आ.संजयमामा शिंदे यांचे वर्चस्वकुर्डुवाडी,(प्रतिनिधी),१८/०१/२०२१- २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. आज १८ जानेवारी रोजी त्याची मतमोजणी झालेली आहे. एकूण ५१ ग्रामपंचायती पैकी ४९ ग्रामपंचायत मतदानाचे निकाल आज हाती आले त्यापैकी सालसे व जेऊरवाडी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच आ.संजयमामा शिंदे यांच्या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या.


आज झालेल्या निकालांमध्ये अठरा ग्रामपंचायतीं वरती आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले आहे.एकूण वीस ग्रामपंचायत वरती आमदार संजयमामा शिंदे यांची सत्ता येणार आहे‌,यामध्ये उमरड,सावडी ,जातेगाव, बोरगाव, वडगाव,मलवडी,नेरले,केडगाव,पांगरे,कविटगाव, करंजे,साडे,झरे,सौंदे इत्यादी ग्रामपंचायतीवरती आ.शिंदे यांची सत्ता आलेली आहे.


विजयी उमेदवारांचा सत्कार आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळं, लव्हे गावचे सरपंच विलास पाटील यांनी केला .

वीस ग्रामपंचायतीवर आ संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व 
sanjaymama shindes dominance over twenty gram panchayats
 
Top