संदीप भराटे यांचा आमदार संजयमामाकडून कोल्हापुरी चपल जोड व शाल देवून सत्कार कुर्डुवाडी,(राहुल धोका),१८/०१/२०२१  - संजयमामा आमदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,अनवाणी फिरणार असा संकल्प संदीप भराटे या युवकाने केला होता. तो तब्बल दोन वर्ष तो त्याने पाळला .संजयमामा शिंदे यांनी यंदा विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आमदारकी मिळवली ती अशा निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच.संदीप भराटे हा संजयमामांचा चाहता ठरला.


     संजयमामा शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांसह  संदीपच्या घरी जावून कोल्हापूरी चप्पलीचा जोड , शाल ,श्रीफळ देवून सत्कार केला.संदीपने मामा आमदार होण्यासाठी आपल्या आराध्या देवी माढेश्वरीला नवस केला होता की,संजयमामा आमदार झाले तरच तुझे दर्शन करायला येईन . आमदार संजयमामा शिंदे यांना हि माहिती मिळाल्यानंतर राजू भिसे,भिमा कोळी,श्रीकांत देशमुख ,साहिल भिसे,जयसिंग गाडे,संभाजी चौधरी,चंद्रकात गवळी,अमोल जगदाळे,मुस्ताक बागवान आदींनी संदीपच्या घरी जावून त्याचा  सत्कार केला. 


#sandeepbharate # mla sanjay mama #kurduwadinews #pandharurnews #dnyanpravahnews 

संदीप भराटे यांचा आमदार संजयमामांकडून सत्कार   Sandeep Bharate felicitated by MLA Sanjay Mama
 
Top