उद्योगपती स्व.जयकुमारजी पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

        पंढरपूर,०६/०१/२०२१ - रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.समृद्धी दामोदर सावंजी ही उद्योगपती स्व.जयकुमारजी पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण राज्यातून तिसरी आली आहे.

लोकशाही राज्यव्यवस्थेमधील प्रसारमाध्यमांची भूमिका

           सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्यावतीने उद्योगपती स्व. जयकुमारजी पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. 'लोकशाही राज्यव्यवस्थेमधील प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावर ती बोलली.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे,उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक,उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे यांनी अभिनंदन केले.

समृद्धी सावंजी हीस सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.राजाराम राठोड,डॉ.दत्तात्रय डांगे,डॉ.रमेश शिंदे , प्रा.सुभाष कदम व वाड़्मय मंडळाचे प्रमुख डॉ. धनंजय वाघदरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत समृध्दी सावंजी  samruddhi sawanji third in state level oratory competition
 
Top