त्यांच्या सुरक्षेत कपात करून महाविकास आघाडी सरकारने सूड उगविला

    मुंबई,दि.११/०१/२०२१- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकार विरोधात आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे आंबेडकरी जनतेत तीव्र नाराजी

     बहुजनांचे संघर्षनायक म्हणून अन्याय होईल तिथे सर्व प्रथम पोहोचणारे,सर्व जाती धर्माच्या गरीब,गरजूंना अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देणारे लोकनेते म्हणून ना.रामदास आठवले लोकप्रिय नेतृत्व आहे. त्यांची लोकप्रियता सतत वाढत असल्याने जळाऊ वृत्तीतून काही समाजकंटकांनी त्यांच्या सभा दौऱ्यामध्ये दहशत माजविल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.त्यांच्यावर अंबरनाथ येथे मागील वर्षी हल्ल्याचाही प्रयत्न झाल्याची आठवण अजून ताजी आहे. प्रत्येक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक मुद्द्यावर भूमिका घेणारे,अन्याय होईल तिथे धावून जाणारे, जनतेत थेट मिसळणारे,अतिमहत्वाचे सेलिब्रिटी नेतृत्व म्हणून ना.रामदास आठवले यांना झेड सुरक्षा देणे आवश्यक असताना त्यांच्या सुरक्षेत कपात करून महाविकास आघाडी सरकारने सूड उगविला आहे असा तीव्र संताप राज्यभर रिपब्लिकन कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

महाविकास आघाडी सरकार विरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे उद्या मुंबईत आंदोलन

     याबाबत उद्या मंगळवार दि.१२ जानेवारी रोजी मुंबईत अनेक ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे असा ईशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी आज दिला.

    हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती भीमशक्तीचे स्वप्न ना.रामदास आठवले यांनी साकार केले. त्यासाठी प्रवाहाविरुद्ध जाऊन दलित सवर्ण यांच्यात मनोमिलन घडवून शिवशक्ती भीमशक्तीची एकजूट ना. रामदास आठवले यांनी घडविली. त्या एकजुटीवर घाव घालण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत युती केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना.रामदास आठवलेंवर कोत्या मनोवृत्तीतून सूड उगवीत आहेत. त्यांची ही कृती आणि मनोवृत्ती कायम राहिल्यास अशी कृती मुख्यमंत्री पदावर कलंक लावणारी ठरेल.शिवशक्ती भीमशक्तीमुळे मिळालेला जनाधार आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनाला गमवावा लागेल असा इशारा देऊन रिपब्लिकन मराठा आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा तीव्र धिक्कार केला आहे.

      आज रिपब्लिकन पक्षाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत यासाठी निवेदन पाठविल्याची माहिती पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली आहे. 

   इगतपुरी येथे केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यातर्फे इगतपुरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्याची माहिती सुनील रोकडे यांनी दिली.

         केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि राजकीय पक्षाचे प्रमुख असताना ना.रामदास आठवले यांची सुरक्षा व्यवस्था कोणत्या नियमाने काढली असा संतप्त  सवाल आंबेडकरी जनतेत विचारला जात आहे .

    महाविकास आघाडी सरकार विरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबईत आंदोलन 
republican bahujan vidyarthi parishads agitation in mumbai against the mahavikas aghadi government
 
Top