कुर्डुवाडी शहरात विविध उपक्रमांसह प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


कुर्डुवाडी,(राहुल धोका),दि.२६/१/२०२१ - कुर्डुवाडी शहरात जागो जागी ध्वजारोहण करत प्रजासत्ताक दिन साजरा झाला. सुर्वे हास्पिटल येथे विविध संस्थांकडून रक्तदान शिबिर तर बोबडे हाँस्पिटल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते.युवराज कोळी मित्र मंडळाने मिठाईचे वाटप केले .


   उपविभागीय कार्यालय येथे प्रांतअधिकारी ज्योती कदम, टिळक चौक येथे शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, पंचायत समिती येथे पंचायत समितीचे उपसभापती धनाजी जवळगे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी डॉ.संताजी पाटील,उपअभियंता एस जे नाईकवाडी,सयाजीराव बागल,रमेश बोराटे,गटशिक्षणाधिकारी श्री.फडके,महेश शेंडे आदीसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते .


   नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष समिर मुलाणी,रेल्वे स्टेशन येथे आर डी चौधरी ,स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी श्री.भानवसे,मुकुंद काळे,हरिष भराटे,राहुल धोका, अनिल कापुरे उपस्थित होते. 


     महात्मा ज्योतिबा फुले काॅलेज येथे उपनगराध्यक्ष उर्मिला बागल यांच्या हस्ते तर आझाद मैदान येथे नगरपरिषद आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण,गांधी चौक येथे नगरपरिषद  मुकादम सुरेश कदम यांचे हस्ते व गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण हस्ते शिवाजी खवळे यांचे हस्ते केला. यावेळी दत्ताजी गवळी,गणेश गोरे यांची प्रमुख उपस्थिति होती.

   मंगल इंग्लिश मेडीयम स्कुल येथे संस्थेच्या सचिव विजया लक्ष्मी गोरे,आँल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प असो या ठिकाणी विशाल अप्पा गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी औदुंबर सुतार आदी मान्यवर उपस्थिति होते. 

     कुर्डुवाडी पोलिस ठाणे येथे पोलिस निरिक्षक रविंद्र डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

       नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपणही केले गेले.यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे शालेय रैलीना फटा देण्यात आला होता.

कुर्डुवाडी शहरात विविध उपक्रमांसह प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  republic day celebrations in kurduwadi city with various activities
 
Top