पंढरपूर,२६/०१/२०२१ - रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महा विद्यालयामध्ये ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कँडेटनी ध्वजास मानवंदना देवून संचलन केले.

       या कार्यक्रमास पनवेल येथील कला व वाणिज्य महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी.गडदे व सेवा निवृत्त उपप्राचार्य सुदाम गायकवाड,उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक,उपप्राचार्य डॉ.लतिका बागल, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे,राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख डॉ.समाधान माने,राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान चे समन्वयक डॉ.बजरंग शितोळे,स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल,शारीरिक शिक्षण संचालक डॉ.नितीन सोहनी, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव,सिनियर, ज्युनिअर व व्यावसायिक कौशल्य शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अमर कांबळे यांनी केले.

  कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न republic day celebrated at karmaveer bhaurao patil autonomous college
 
Top