पंढरपूर,२६ जानेवारी २०२१- ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा पंढरपूर शहर व तालुक्याच्यावतीने संघाच्या नवी पेठ येथील कार्यालय परिसरामध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


  यावेळी उपस्थित सर्व बंधू-भगिनींना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले.


या छोटेखानी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई सोलापूर जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी व दैनिक महान कार्याचे सोलापूर जिल्हा उपसंपादक राजेंद्र कोरके पाटील, दैनिक राष्ट्रगीतचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कुमार कोरे, ज्ञानप्रवाह न्यूजचे प्रतिनिधी नागेश आदापुरे त्याचप्रमाणे आढिवचे माजी सरपंच दिनकर चव्हाण, पुळूजचे माजी सरपंच ज्ञानेश्वर कांबळे,एन.वाय.ग्रुप पंढरपूरचे प्रमुख नितीन यादव यांच्यासह परिसरातील रामचंद्र बिराजदार,संजय कदम,योगेश यादव, कृष्णा कवडे,राजू माळी,संतोष माने, अनिल विभुते,दिलावर बागवान,पंजाब चंदनशिवे,गोपाळ वाघमारे,दाजी वाघमारे, रमेश स्वामी, महादेव वाघमारे,अजित पालसांडे,श्री बारस्कर आदीसह नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रजासत्ताक  republic day by maharashtra state marathi press association
 
Top