पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र सरवदे

         पंढरपूर (प्रतिनिधी),१४/०१/२०२१- पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील रामचंद्र सरवदे यांची निवड करण्यात आली .ही निवड पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या उपस्थितीत राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना,सोलापूर यांच्या हस्ते रामचंद्र सरवदे यांना निवडीचे पत्र व पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखपत्र,हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पंढरपूर येथील संत गाडगे महाराज मठ याठिकाणी आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.

          या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे,आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी रामचंद्र सरवदे आणि पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .

         यावेळी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष यशवंत कुंभार ,उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे,खजिनदार श्रीनिवास उपळकर या नुतन पदाधिकार्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोलापूर शहर उपाध्यक्ष बिपीन दीड्डी,अक्षय बबलाद,बाबा काशीद,पुरुषोतम राठी, विक्रम वाघमारे,आण्णा धोत्रे तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे राजेंद्र काळे,विश्वास पाटील,दत्ता पाटील,राधेश बादले पाटील, बाहुबली जैन,अमर कांबळे,रामकृष्ण बिडकर,चैतन्य उत्पात, कबीर देवकुळे,रवी शेवडे ,प्रकाश सरताळेसह पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.

पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र सरवदे ramchandra sarvade as solapur district president of patrakar suraksha samiti
 
Top