शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने राजामाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा


पंढरपूर,(नागेश आदापूरे)- हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य, चरित्र,संघटन,पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या, हिंदवी स्वराज्याच्या दोन दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंतीनिमित्त मनाचा मुजरा व जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार घालून अभिवादन करताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,शिवस्वराज्य युवा संघटनेचे शहराध्यक्ष किरण शिंदे,संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे, माजी शहराध्यक्ष धनंजय मोरे,छावाचे सोपान काका देशमुख, छावाचे विकी झेंड, रवी देवकर,जगदिश पवार,इबरान बागवान सह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने राजामाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव सोहळा rajamata jijau masaheb janmotsav ceremony on behalf of shivswarajya youth organization
 
Top