खर्डीमध्ये या वेळची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची

खर्डी,(अमोल कुलकर्णी)- जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील खर्डी मध्ये या वेळची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. एकूण पंधरा जागांपैकी तीन जागा या परिचारक गटाच्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. परिचारक-भालके- काळे या गटाविरुद्ध जागृत ग्रामविकास पॅनलमार्फत नवतरुण आपलं भविष्य आजमावत आहेत. उमेदवार निवडीच्या बैठकीमध्ये विचारात न घेतल्याने काहीजण अपक्ष लढत आहेत.

        काही जागांवर नव्यानेच मंगळवेढ्यातील आवताडे गटाने उमेदवार उभे आहेत.गेली अनेक वर्ष परिचारक गटाची निर्विवाद सत्ता ग्रामपंचायती मध्ये असून यावेळी मात्र अनिश्‍चितता कायम राहिली आहे.नेहमी सुखकर वाटणारा प्रभाग क्रमांक दोन हा गुंतागुंतीचा निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधून लढणाऱ्या अनेकांची झोप उडाली आहे.दरवेळी ग्रामपंचायती ला मतदान व्यवस्थित होते. पण आमदारकीला तेच मतदान विरोधात जात असल्याने यंत्रणेत कुठेतरी कमतरता दिसून येत असल्याचे परिचारक गटाकडून बोलले जात आहे.

        रस्ते,वीज,पाणी,घरकुल आणि रेशन धान्य दुकान या मुद्द्यावर प्रचार रंगात आला आहे. निवडणूक होताना झालेल्या मतदानावरूनच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.या ग्रामपंचायत निकालावर पुढील पंचायत समिती,जिल्हा परिषद अवलंबून आहे.

पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले खर्डी ग्रामपंचायतीकडे 
pandharpur taluka turned its attention to khardi gram panchayat
 
Top