दोन महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय झाल्याने काम बंद आंदोलन स्थगित

          पंढरपूर, ०६/०१/२०२१- पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे ,जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर ,कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारेंसह कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने व शासनाने सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदेला न दिल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन महिन्याचे वेतन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शासनाने या राज्यव्यापी आंदोलनाची घेतली दखल

      जोपर्यंत दोन महिन्याचे वेतन मिळत नाही व यापुढे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.परंतु शासनाने काल या राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेत संध्याकाळी एक महिन्याची सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपालिकांना देण्याचे आदेश काढले.शासनाने एक महिन्याचे वेतन दिले असले तरीसुद्धा गेल्या दोन महिन्यापासून नगरपरिषद कर्मचारी पगारा पासून वंचित असल्याने दोन महिन्याचा पगार होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी भूमिका संघटनेने घेतली होती.

    याबाबत आज नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे थकलेले दोन महिन्याचे वेतन ११ जानेवारीपर्यंत देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर कामगार संघटनेच्यावतीने आपले काम बंद आंदोलन स्थगित करीत असल्याचे कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर यांनी जाहीर केले. १४ जानेवारी रोजी संक्रात असल्याने ११ जानेवारीपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन न झाल्यास १२ जानेवारीपासून पुन्हा काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

      यावेळी नगरपरिषद पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक विवेक परदेशी, रेणुका घोडके उपस्थित होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कामगार नेते नागनाथ तोडकर उपाध्यक्ष जयंत पवार अनिल गोयल संतोष सर्वगोड, किशोर खिलारे ,संजय माने ,दत्तात्रय चंदनशिवे ,धनजी वाघमारे, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव,सुनील सोनार, संजय वायदंडे , पराग डोंगरे यांनी विशेष प्रयत्न केले.

पंढरपूर नगरपरिषद कामगारांचे काम बंद आंदोलन  
pandharpur municipal corporation workers strike halted
 
Top