पंढरपूर,०८/०१/२०२१- आढीव,ता.पंढरपूर येथे नंगी तलवार हातात घेऊन दहशत माजवल्या प्रकरणी सागर हिंदुराव पासले,वय ३०,रा.आढीव, ता.पंढरपूर याला शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .


   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आढीव, ता.पंढरपूर येथील सागर पासले हा हातात तलवार घेवून फिरत आहे,अशी माहिती पंढरपूर तालुका ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यांनी स.पो.फौ.अशोक जाधव,पो.ना.प्रकाश कोष्टी, नितीन माळी,श्रीराम ताटे यांचे पथक तयार केले. त्या पथकाला खाजगी वाहनाने आढीव येथे पाठविण्यात आले .

   यावेळी जिल्हा परिषद शाळेसमोर रोडवर सागर हिंदुराव पासले हा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तलवारीचे कव्हर घेवुन उभा असलेला दिसला. त्यास गराडा घालून जागीच पकडले. सागर हिंदुराव पासले याच्याजवळ शस्त्र जवळ बाळगण्याचा परवाना नाही. तरीही तो लोखंडी तलवार बेकायदेशीररित्या जवळ बाळगलेल्या परिस्थितीत मिळुन आला आहे. यामुळे त्याच्या विरुध्द शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ सह महा पोलीस कायदा कलम १३५,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो. फौ.अशोक जाधव हे करत आहेत.

आढीव येथे नंगी तलवार हातात घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी एक अटकेत 
one arrested for terrorizing at adhiv with naked sword in hand 
 
Top