अजीत ताराचंद फडे यांच्या घरातील चोरीचा पोलिसांनी लावला छडा


  पंढरपूर,(प्रतिनिधी)- पंढरपूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या महावीरनगर या परिसरात राहणारे अजित फडे यांच्या घरफोडीचा गुन्हा शहर पोलिसात दाखल होताच गुन्हे अन्वेषण विभागाने गतीने चोरीतील गुन्हेगारांच्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली आणि यामध्ये त्यांना यश आले.सदर गुन्ह्यातील आरोपीसह सोन्या-चांदीचे तसेच पितळाचे भांडे ऐवजासह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ११ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश मिळाले.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा समावेश

   याबाबत अधिक माहिती अशी पंढरपूरातील महावीरनगर परिसरात राहणारे संजीवनी आणि अजित फडे हे नऊ डिसेंबर रोजी त्यांच्या मुलगी मधुरिमा हिला पुणे येथे सोडण्याकरिता गेले होते. त्यानंतर ते १३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुलीला सोडून परत पंढरपूर येथे घरी आले असता त्यांनी घराचे कुलूप खोलून घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने एकूण अंदाजे किंमत बारा लाख पंचवीस हजार पस्तीस तोळे वजनाचे तसेच चांदीची भांडी एकूण पाच किलो ९० ग्रॅम वजनाची दोन लाख रुपये किंमतीची पितळ धातूच्या भांडी जिओमी ए सेवन कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत पाचशे पन्नास हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये वेगवेगळ्या दराच्या चलनी नोटा असा एकूण १४ लाख ७५ हजार पाचशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने,मोबाइल व रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली.यामध्ये अज्ञात चोरट्याने संजीवनी फडे यांची नजर चुकवून उघड्या घरात प्रवेश करून घरातील दागिने चोरून नेले असले बाबत फिर्यादीत म्हटले आहे.

       भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करण्याकरता घटनास्थळावरील सीसीटीव्हीद्वारे तपास करूनही सदर अज्ञात आरोपीचा शोध लागत नसल्याने व सदर अज्ञात व्यक्ती ही घराशी परिचीत असल्याच्या संशयावरून या गुन्ह्याचा तपास फिर्यादी व त्यांच्या घरातील व्यक्तींकडे तसेच त्यांच्या घरात काम करण्याकरता येणारे व त्यांच्या घरात येणारे जाणारे यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या इथे येणाऱ्या सर्व इसमांच्या हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.यातील फिर्यादीच्या घरी कधी कधी कामाकरता येणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांना संशय आल्याने तांत्रिक दृष्ट्या त्याच्यावर गोपनीय लक्ष ठेवण्यात आले.या इसमाचा हालचाली संशयास्पद दिसून आल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन प्रथमता त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल मिळून आला.नंतर त्यास पोलीस ठाण्यात आणून अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाबाबत तपास करून चौकशी केली असता मला सोन्याचे दागिने एकूण अंदाजे २८ तोळे वजनाचे ९ लाख ८० हजार रुपये किमतीचे तसेच चांदीचे भांडे तीन किलो ५० ग्रॅम वजनाची १ लाख ४० हजार रुपये किमतीची धातूची भांडी ५०० रुपये किमतीचा जिओनी ए सेवन कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ११ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

          सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर,पोहेकॉ सुरज हेंबाडे,राजेश गोसावी,शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे,पोना गणेश पवार,इरफान शेख,शोएब पठाण, सिद्धनाथ मोरे,सुजित जाधव,संजय गुटाळ, समाधान माने,सुनिल बनसोडे,अन्वर आत्तार सायबर पोलीस ठाणे यांनी केली. 

#pandharpur crime #burgler pandharpur #city police #pandharpur police #pandharpur news #dnyanpravahnews 
 
Top