वारंवार गायब होणारी बीएसएनएलची सेवा

     पंढरपूर,(प्रतिनिधी),१३/०१/२०२१ - पंढरपूर मधील बीएसएनएलची सेवा क्षणात गायब तर तासनतास बंद होत असून याकडे येथील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तर याबाबत वरिष्ठांना याचे काही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होत आहे.ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याची बीएसएनएलच्या अधिकारी वर्गाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही . वारंवार गायब होणार्‍या बीएसएनएल इंटरनेट सेवेमुळे बरेचश्या खासगी कंपन्या इतर मोबाइल इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत.तसेच पंढरपूर येथे बीएसएनएल कार्यालयाने एफ.टी.टी.एच सेवेसाठी दोन टीप पन नेमले असून ते चांगल्या रितीने सर्विस देत आहेत.परंतु बँका, शासकीय कार्यालय अजूनही बीएसएनएल इंटरनेट वापरत आहेत पण वारंवार इंटरनेट बंद होत असल्याने बँकांमध्ये नागरिकांच्या लाांबच लाांब रांगा लागत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परिक्षा देणे, शिष्यवृत्ती फार्म भरणे आदी गोष्टींमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. 

       बीएसएनएलचे कामकाज आता वेंटिलेटरवर

        अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासकीय कर्मचारी यांच्या बरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी याबाबत पंढरपूर बीएसएनएल ऑफिस च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन सेवा पुर्ववत देणे गरजेचे बनले आहे अन्यथा या अगोदरच सलाईनवर असलेल्या पंढरपूरच्या बीएसएनएलचे कामकाज आता वेंटिलेटरवर तरी सुरू आहे तेही गमावण्याची पाळी येऊ नये.सेवा जरी व्यवस्थित नसली तरी बील मात्र वेळेवर येते, बील भरा यासाठी फोन काँल अगत्याने करण्यात येतात. त्यामुळे मोबाईलधारक दुसर्‍या सर्विस प्रोव्हायडरकडे वळत आहेत तर लँडलाईनचे कस्टमर सेवा बंद करण्याचे मार्गावर असले तरी त्याचे कोणतेही सोयरसुतक कर्मचारी आणि अधिकारी यांना असेल असे वाटत नाही.   

बीएसएनएलची सेवा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे व्हेंटिलेटरवर 
on the ventilator due to the negligence of bsnls service officers
 
Top