उमंग गोसावी यांच्या हस्ते किरण रिजिजू यांचा सत्कार 

पंढरपूर - भारत सरकारचे युवा कार्य व क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते भारत खेलेगा स्पोर्ट्स अकॅडमी चे इन्कलाब प्रोजेक्टच्या दुसऱ्या टप्प्यातील शुभारंभ सोहळा पुणे येथील लेडी रमाबाई हॉल एस पी कॉलेज टिळक रोड येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये पंढरपुरातील वीर पिता श्री व सौ वृंदा मुन्नागिर गोसावी यांच्या स्नुषा व शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानचे सदस्य वीर पत्नी उमा गोसावी व वीर कन्या उमंग गोसावी यांना कार्यक्रममधील प्रमुख अतिथी किरण रिजिजू यांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार सदर कार्यक्रमां मध्ये उमा व उमंग गोसावी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


     या कार्यक्रमांमध्ये किरण रिजिजूंच्या हस्ते वीर पत्नी उमा गोसावी यांचा साडी व बुके देऊन सन्मान करण्यात आला तर वीर कन्या उमंग गोसावी हिस बॅडमिंटन किट देऊन गौरविण्यात आले.

हजार खेलो इंडिया निपुणता केंद्र उभारणार

          येत्या २०२८ पर्यंत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असेल तर स्थानिक पातळी पासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.त्यासाठी देशातील सुमारे सातशे जिल्ह्यात सुमारे हजार खेलो इंडिया निपुणता केंद्र उभा करण्याची योजना आहे असे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले.

        सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया,स्पोर्टस अथाँरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय संचालिका सुस्मिता जोत्शी,पुण्याचे खासदार गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे आदी यावेळी उपस्थित होते.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न- क्रीडामंत्री किरण रिजिजू 
my dream is india to be in top ten in olympic medalists- sports minister kiran rijiju
 
Top