मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या मोर्चा आंदोलनाला मोठे यश बजाज फायनान्स कंपनीला२.५०कोटी दंड

पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या आंदोलनाला यश आले आहे.लॉकडाऊन काळात बजाज फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या सर्वाना कर्ज परतफेड करण्यासाठी बजाज फायनान्सवाले कर्ज वसुलीसाठी जनतेला नाहक त्रास देत होते. लॉकडॉऊन काळात गरिबांना रोजगार उपलब्ध नव्हता तरी देखील कर्ज भरण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. वास्तविक हे सर्व शासकीय आदेशाचे उल्लंघन करून कर्ज भरण्यासाठी जबरदस्ती केली जात होती.


त्यामुळे या सक्तिच्या वसुलीविरुद्ध मनसेचे सरचिटणीस तथा सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेला घेऊन प्रचंड मोठे मोर्चे काढले होते.या मोर्चामध्ये पुरूषांसह महिलांची उपस्थिती मोठी होती.


त्या मोर्चांची दखल घेऊन रिझर्व बँकेने बजाज फायनान्स कंपनीला २.५० कोटी दंड ठोठावला आहे.

मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या मोर्चा आंदोलनाला यश 
mns's dilip dhotre's morcha andolan success
 
Top