जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आदेश

       सोलापूर, दि.०७/०१/२०२१ - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान दि.१५ जानेवारी २०२१ रोजी होत आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी  जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून)  मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास  मनाई करणेत येत असल्याचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत.

            बार्शी तालुक्यातील कासारी व कारी, अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर, मैदर्गी व करजगी, पंढरपूर तालुक्यातील तारापूर, चळे, बाभूळगांव, पिराची कुरोली, शेळवे, मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, सांगोला तालुक्यातील जवळा, खवासपूर, कोळे, मेथवडे, नाझरे व शिरभावी, माळशिरस तालुक्यातील गिरवी, तांदूळवाडी, उंबरे(वेळापूर), बोरगांव, माढा तालुक्यातील मानेगाव, खैराव, माहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड, हिंगणी(नि.), अंकोली आणि टाकळी (सि.) या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील.

मतदान प्रक्रिया निर्भय निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी आठवडी बाजार बंद

      मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदान प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय श्री.शंभरकर यांनी घेतला आहे.

ग्रामपंचायत मतदाना दिवशी आठवडी बाजार राहणार बंद market will be closed for a week on Gram Panchayat polling day 
 
Top