पंढरपूर, ०७/०१/२०२१- समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने दिनदयाळ मंदिर येथील कार्यालयात पंढरपूर नगर पालिकेच्या बिनविरोध निवडलेले बांधकाम समिती सभापती सुरेश नेहतराव, आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट


    तसेच पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिनविरोध सदस्य झालेले संजय अभंगराव,वाखरी, किरण साळुंखे,सौ रंजना शिंदे अरण, सौ वैजयंती अधटराव व सौ कविता कोरे, शेगाव दुमाला यांचा सत्कार कोळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,श्री पुंडलीक देवस्थान ट्रस्टी आबा नेहतराव,श्रीमंत परचंडे,सतिश नेहतराव, कुमार संगितराव आदींच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी पंढरपूरचे उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,उमेश संगितराव,अनिल ज्यो.अभंगराव, दत्तात्रय कांबळे,मारुती संगितराव,उत्तम परचंडे, सोनू अधटराव,गणेश अंकुशराव आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.


महादेव कोळी समाजाच्यावतीने निवडणुकीतील यशस्वितांचा सत्कार mahadev koli community felicitates election winners

 
Top