पंढरपूर, ३१/०१/२०२१- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला भाविकांनी दिलेल्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रभर १५६ गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र हेक्टर ९४२.०४ आर (२३५५) एकर आहे.त्यापैकी हेक्टर ४०८.७२ आर (१०२१) एकर जमिन ताब्यात घेऊन त्यावर मंदिर समितीचे नाव दाखल केले आहे.यामध्ये प्रामुख्याने पुणे विभागामध्ये सांगली, सातारा,सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यां मध्ये तसेच अमरावती, बुलढाणा,नागपूर,यवतमाळ,अकोला, नगर जिल्ह्यामध्ये आहेत.त्यासाठी स्वतंत्ररीत्या मालमत्ता अधिकारी व त्यांना दोन मदतनीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लोकांमध्ये ११३ एकर जमिनीवर नाव दाखल करण्यात आले आहे .तर इतर जमिनींवर नाव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या जमिनीपैकी १०२.१६ आर हेक्टर इतके क्षेत्र शेतकऱ्यांना लिलाव पद्धतीने अकरा महिन्यां साठी खंडाने देण्यात येत आहेत.त्यामध्ये यावर्षी ११.५६ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

      ताब्यात घेतलेल्या जमीनींबाबत ६४ प्रकरणी न्यायालयात सुरू होती. त्यामध्ये आठ निकाल मंदिर समितीच्या बाजूने लागले आहेत.उर्वरित ५६ न्यायालयीन प्रकरणांसाठी स्वतंत्र विधिज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.जमिनीच्या खंडातून मिळत असलेले उत्पन्न मंदिरे समितीच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत झाला आहे.जमिनी ताब्यात घेण्यासाठी मंदिर समिती च्यवतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.जमिनींच्या सर्व रेकॉर्ड्सचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे .

       तसेच मंदिर दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी भाविकांना खुले झाल्यापासून आतापर्यंत १ लाख ५६ हजार भाविकांनी श्रींच्या मुक्त दर्शनाचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यापासून हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे .मंदिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत १.८१ कोटी रुपये इतके उत्पन्न मंदिर समितीस प्राप्त झाले आहे अशी माहिती विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

पंढरपूरला भाविकांनी दिलेल्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या lands given by devotees to Pandharpur are scattered all over maharashtra
 
Top