कुर्डूवाडीत सराफांना लुबाडणारी टोळी जेरबंद

कुर्डुवाडी,(राहुल धोका),०५/०१/२०२१ -कुर्डुवाडी शहरातील सराफ व्यापारी शुभंकर पाठक तसेच विशाल पुर्वत यांना लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीस जेरबंद केल्यामुळे येथील कुर्डुवाडी सराफ व सुवर्णकार असोसिएशनने पोलिस निरिक्षक रविंद्र डोंगरे,पोलिस उपनिरिक्षक चिमणाजी केंद्रे यांचा सत्कार केला आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत आभार मानले.


शहरातील ट्रँक्टर चोरी,एटीएम‌ मशिन फोडणारी टोळीसह अनेक गुन्हेगार जेरबंद होत असल्याने शहरवासिंयातून पोलिस करत असलेल्या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे .


       सत्कार प्रसंगी अध्यक्ष सुहास शहा,विशाल पुर्वत,आनंद कोठारी,दर्शन देवी,बाळु पाठक,राजु पाठक,प्रितम धोका,रोहित पुर्वत,शंकर वेदपाठक, मारुती माळी,मदन पोतदार,सागर पाठक आदि‌ व्यापारी उपस्थित होते.

कुर्डूवाडी सराफ असोशियनने केला पोलिस बांधवांचा सत्कार 
kurduwadi saraf association felicitated police brothers
 
Top