कुर्डुवाडी मनसेने औरंगाबादला जाणार्‍या बसला चिटकवले छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टीकर 

 

       कुर्डुवाडी,(राहुल धोका),१२/०१/२०२१-औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे यासाठी‌ मनसेकडून उपविभागीय अधिकारी,कुर्डुवाडी आगार यांना निवेदन देण्यात आले.तसेच कुर्डुवाडी बस स्थानकामध्ये औरंगाबादला जाणाऱ्या राज्यातील गाड्यांना कुर्डुवाडी येथे छत्रपती संभाजीनगर हे फलक लावण्यात येत होते.  


    सदरचे आंदोलन कुर्डूवाडी शहर मनसेच्या वतीने करण्यात आले असून शहर संघटक आकाश लांडे ,उपाध्यक्ष गणेश चोैधरी,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष युवराज कोळी अमोल घोडके, ओंकार चोैधरी,रामभाऊ थोरात,अनिकेत डिसले, मनोज नवगिरे, चिकू मोरे, ऋषभ राऊत आदि  महाराष्ट्र सैनिक या वेळी उपस्थित होते.

कुर्डुवाडी मनसेने औरंगाबादला जाणार्‍या बसला चिटकवले छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टीकर Kurduwadi MNS affixes Chhatrapati Sambhajinagar sticker on Aurangabad bound bus
 
Top