एसटीईएम,अंतराळ शिक्षणाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनासाठी इस्रो देशभरातल्या १०० अटल टिंकरिंग प्रयोगशाळा घेणार दत्तक
        नवी दिल्‍ली,PIB Mumbai,११ जानेवारी २०२१- झालेल्या एका रोमांचक आभासी कार्यक्रमामध्ये अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी जाहीर केले की, एसटीईएम आणि अंतराळ शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी इस्रो देशभरातल्या १०० अटल टिंकरिंग प्रयोगशाळा दत्तक घेणार आहे. यामुळे आपल्याकडे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित नाविन्यपूर्ण आणि वेगळे काही करून दाखविण्यासाठी उत्सुक असलेल्या नवतरूणांना अटल टिंकरिंग प्रयोगशाळेच्या माध्यमातून शिकता येणार आहे. तसेच मनापासून सर्वोत्तम शिक्षण घेण्याची संधी या मुलांना मिळणार आहे. तसेच या मुलांच्या दृष्टीने त्यांची शाळेबरोबरच कुटुंबिय आणि स्थानिक समुदायही एक प्ररेणादायक उदाहरण बनणार आहे.

तर त्यांचा संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारण्यास मदत

      या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इस्रोचे अध्यक्ष डॉ.के सिवन म्हणाले की,हे पाऊल पारंपारिक शिक्षणाच्या तुलनेत शालेय मुलांमध्ये नाविन्यपूर्ण आणि अनुभवात्मक शिक्षणास प्रोत्साहित करण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे प्रकल्पाधारित शिक्षण जर शालेय वयापासूनच मुलांना दिले गेले तर त्यांचा संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारण्यास मदत होईल’, असेही मत डॉ. सिवन यांनी यावेळी व्यक्त केले. देशभरातल्या १०० अटल टिंकरिंग प्रयोगशाळा भौगोलिकरित्या इस्त्रोकडून दत्तक घेण्यात येणार असल्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’चा भाग बनून मुलांना अंतराळ क्षेत्राच्या दिशेने पाऊल टाकता येणार असून आपल्या स्वप्नांची पूर्ती करता येणार आहे.

इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतचे ३ दशलक्षांपेक्षा जास्त मुलांना लाभ

        अटल टिंकरिंग प्रयोगशाळेतल्या मुक्त वातावरणामुळे मुलांच्या मनातल्या अनेक जिज्ञासा, विविध कल्पना प्रत्यक्षात कशा आणता येतील यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने कौशल्य विकसित केले जाते. उद्योजकता आणि नवीनता यांचा मेळ साधला जात आहे. युवामनांच्या विचारशक्तीला चांगले पोषण मिळावे,यासाठीच नीतीआयोगाने देशभरात अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत ७००० टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत.त्यांचा इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतचे ३ दशलक्षांपेक्षा जास्त मुलांना लाभ होत आहे.

इस्रो देशभरातल्या 100 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा दत्तक घेणार 
isro will adopt 100 atal tinkering laboratories across country
 
Top