ज्ञानेश्वरनगर येथील रहिवाशांची होणार त्रासातून मुक्तता


पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील संत ज्ञानेश्वर नगर व फत्तेपूरकर येथे विवीध विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले,माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे,माजी नगराध्यक्ष सतीश मुळे, माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.

        ७४ लाख रुपये खर्चून होणार बंदिस्त गटारी 

     यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, ज्ञानेश्वरनगर येथील रहिवाशांना पावसाच्या व सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ७४ लाख रुपये खर्चून या ठिकाणी बंदिस्त गटारी होणार आहेत.फत्तेपूरकरनगर येथे अंतर्गत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्याची मागणी लक्षात घेऊन हे काम हाती घेतले आहे.


यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक इब्राहिम बोहरी, नगरसेवक राजू सर्वगोड,धर्मराज घोडके, सभापती विक्रम शिरसट,नगरसेवक विशाल मलपे,नागेश  दगडू धोत्रे,समाजसेवक सत्यविजय मोहोळकर, गणेश दगडू धोत्रे,नगरसेवक डी राज सर्वगोड, रामचंद्र दगडू धोत्रे,समाजसेवक बसवेश्वर देवमारे,अमोल डोके,नरेंद्र डांगे,नवनाथ रानगट, दत्तात्रय धोत्रे,गणेश पवार,तुळजाराम बंदपट्टे, भीमराव पवार,संतोष काळे,औदूंबर शिंगाडे, नितीन धोत्रे, लाला शिंगाडे,अप्पा भोरे,धनाजी वाघमारे, प्रभाकर बंदपट्टे,प्रल्हाद शिंदे,प्रमोद सागर,राजू कांबळे,रमेश जगदाळे,संतोष बंदपट्टे, किशोर जाधव,अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.

पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक ११ मधील विविध विकास कामांचा आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ 
inauguration of various development works in ward no.11 of pandharpur by mla prashant paricharak
 
Top