पंढरपूर, ११/०१/२०२१- श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरची सभा आज सोमवार, दि.११/०१/२०२१ रोजी स.११.०० वा.श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

        या सभेस सदस्य संभाजी शिंदे,ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर),ह.भ.प.प्रकाश जवंजाळ,सौ.साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखा अधिकारी सुरेश कदम उपस्थित होते. या सभेत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.


श्रीच्या दर्शनाबाबत - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकांना ऑनलाईन दर्शन प्रणालीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तथापि भाविकांची मागणी लक्षात घेता,या प्रणाली द्वारे बुकींग करणा-या भाविकांच्या संख्येत वाढ करून दि. १२/०१/२०२१ पासून ४८०० वरून ८००० करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

        या ऑनलाईन बुकींग खेरीज जे भाविक बुकींग न करता दर्शनासाठी येतील,त्या भाविकांना ओळखपत्र पाहून (आधारकार्ड/इतर) कोरोना विषयक नियमांचे पालन करून त्यांना सुध्दा दि.२०/०१/२०२१ पासून बुकींग न करता मुखदर्शनाचा लाभ देण्यात येईल. तथापि ६५ वर्षापूढील व्यक्ती,१० वर्षाखालील मुले,गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही.याशिवाय थर्मल स्क्रिनिंगमध्येही आजारी असलेल्या व्यक्तींना देखील प्रवेश नाकारला जाईल.


            मकरसंक्रांत - दि.१३ ते दि.१४ जानेवारी २०२१ या कालावधीत मकरसंक्रांत संपन्न होत आहे. दर वर्षी मोठया प्रमाणात या सणाला श्री.रूक्मिणी मातेस वाणवसा करण्या साठी महिला भाविक येतात. तथापि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुर्तीला स्पर्श करण्यास मनाई असल्याने पदस्पर्श दर्शन खुले करण्यात आलेले नाही.फक्त मुखदर्शन आहे. त्यामुळे यावर्षी मकरसंक्रांतीला वाणवसा करण्यासाठी कोणत्याही भाविकांना परवानगी देण्यात येणार नाही. मात्र, महिला भाविकांची मागणी विचारात घेता , दि.१४/०१/२०२१ रोजी कासार घाट येथून सायं.६.०० ते रा.१०.०० या वेळेत बुकींग न करता फक्त श्रींचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे.तसेच वाणवसा करण्याचे साहित्य मंदिरात घेवून जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.तसेच ६५ वर्षापुढील व्यक्ती, १० वर्षा खालील मुले,गर्भवती महिला,आजारी व्यक्ती यांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याशिवाय थर्मल स्क्रिनिंगमध्येही आजारी असलेल्या व्यक्तींनादेखील प्रवेश नाकारला जाईल.

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरची महत्वपूर्ण सभा 
important meeting of shri.vitthal rukmini mandir samiti,pandharpur
 
Top