केम येथे स्व बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर 

     

  कुर्डुवाडी,(राहुल धोका)- करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने केम येथे शिवसेना प्रमुख हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर भरवण्यात आले होते. या आरोग्य शिबीरासाठी करमाळा तालुका शिवसेना नेत्या रश्मी बागल,माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसैनिकांचे मार्गदर्शक साईनाथ अंभगराव,सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे,शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख आशाताई टोणपे, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, केमचे युवक नेते महावीर तळेकर, शिवसेना तालुका उपप्रमुख श्रीहरी तळेकर,मकाईचे माजी संचालक गोरख जगदाळे, पिंटू रायचुरे, कव्हेचे तानाजी चोपडे, उत्तरेश्वर गोडगे, महिला आघाडी मतदारसंघ प्रमुख साधना खरात आदी उपस्थित होते.


     आरोग्य शिबीरांचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र केम यांच्या सहकार्याने केले होते. या आरोग्य केंद्रामार्फत डाॅ अनिल खटके, डाॅ राऊत मॅडम,डाॅ पालखे यांनी या शिबीरा साठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आशा मोरे, मंगल कावळे, रोहिणी नागणे, राणी तळेकर, मनिषा दौंड, प्रियंका शिंदे, अंजना लोखंडे, सविता गावडे,सरस्वती कुर्डे,रंजना ओहोळ,रोहिणी तळेकर,मंजुळा पळसकर,सुरेखा पळसकर, हसिना पठाण या उपस्थित होत्या.

केम येथे स्व बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर health camp on occasion of late balasaheb thackeray jayanti at Kem 
 
Top