पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी, खेळाडूंचा सन्मान


सोलापूर - भारतीय प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, कोरोना योद्धा, शहिदांचे कुटुंबीय यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


पोलीस आयुक्तालय मैदानावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बक्षिस वितरण तपशील-

पोलीस आयुक्त शहर
पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, विशेष सेवा पदक व आंतरिक सुरक्षा सेवा पदक, सहायक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे, आंतरिक सुरक्षा सेवा पदक,सुनिल धनवे- विशेष सेवा पदक, सौरभ शेटे- विशेष सेवा पद,विशेंद्रसिंग बसवंतसिंग बायस पोलीस उपनिरीक्षक- आंतरिक सुरक्षा सेवा पदक.

पोलीस ग्रामीण-
संतोषकुमार गायकवाड पोलीस निरीक्षक- पोलीस उपअधीक्षक, अक्कलकोट SDPO विशेष सेवा पदक, मनोजकुमार यादव पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण- विशेष सेवा पदक, दिपरतन गायकवाड- पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण- विशेष सेवा पदक, गोरख गायकवाड, पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण- विशेष सेवा पदक, विनायक माहूरकर पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण- विशेष सेवा पदक, गणेश क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, शरद लांडगे, जिल्हा विशेष शाखा

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.140
बलराम शेटे, (पोलीस निरीक्षक)- कठीण व खडतर सेवा पदक (गडचिरोली येथील सेवेबद्दल)

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर
शहीद जवान सुनिल काळे यांची वीरपत्नी अर्चना काळे, (शहीद हवालदार CRPF बटालियन पुलवामा जम्मु काश्मिरमध्ये दि.23.06.2020 रोजी अतिरेकी चकमकीत शहीद-ताम्रपट), केदार श्रीशेल्य (नायक युनिट-15 मराठा बटालियन राजोजी पुज येथे अतिरेकी चकमकीत चार गोळ्या छातीत व 1 गोळी डाव्या हातामध्ये लागून अपंगत्व- ताम्रपट)

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर
ओम अवस्थी- जलतरण या खेळामध्ये कनिष्ठ गटात राष्ट्रीय स्पर्धेत हायबोर्ड प्रकारात रौप्य पदक, भोपाळ येथील वरिष्ठ जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग, ईशा वाघमोडे- जलतरण या खेळामध्ये राजकोट येथील कनिष्ठ गटात राष्ट्रीय स्पर्धेत हायबोर्ड प्रकारात सुवर्णपदक, तसेच कनिष्ठ गटात राष्ट्रीय स्पर्धेत, स्प्रिंगबोर्ड प्रकारात रौप्य पदक- उष्कृष्ट खेळाडू महिला, साधना भोसले आंतरराष्ट्रीय स्तरावर येस बॉल या क्रीडा प्रकारात सहभाग- महिला खेडाळू थेट पुरस्कार, संतोष खेंडे बेसबॉल या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर पदक मिळविणारे खेळाडू घडविले -गुणवंत क्रीडा मार्गदर्शक,

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना कार्यालय सोलापूर
अश्विनी रुरल सेंटर रिसर्च ॲण्ड रिलीफ सोसायटी-19716 रुग्णांना योजनांचा लाभ, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर 6564 रुग्णांना योजनांचा लाभ, अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पीटल रिसर्च सेंटर, 4525 रुग्णांना योजनांचा लाभ, लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, पंढरपूर 3010 रुग्णांना योजनांचा लाभ, डॉ. रघोजी किडनी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर 2989 रुग्णांना योजनांचा लाभ, नवजीवन चिल्ड्रन हॉस्पीटल, पंढरपूर. 2954 रुग्णांना योजनांचा लाभ, समर्थ हॉस्पीटल पंढरपूर 2018 रुग्णांना योजनांचा लाभ, सोलापूर कॅन्सर सेंटर, सोलापूर, 1828 रुग्णांना योजनांचा लाभ, सुविधा आयसीयु ॲण्ड कॅथलॅब सेंटर एलएलपी 1618 रुग्णांना योजनांचा लाभ दिल्याने सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी

शार्दुल गावडे (जि.प. शाळा बार्डी, ता. पंढरपूर, इ.5वी), समृद्धी भोसले (सांगोला विद्यामंदीर प्रशाला, इ.5वी), गौरव जगताप (संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, विठ्ठलवाडी, ता.माढा, इ.8वी) आणि गौरी ढोले (सांगोला विद्यामंदीर प्रशाला, इ.8वी)

खालील सर्व कोवीड योद्धा पुरस्कार

पोलीस आयुक्त सोलापूर शहर

शहिद ताजोद्दीन शेख, सहाय्यक फौजदार,शहिद महादेव राठोड- पोलीस नाईक,शहिद जाकिरहुसेन इदायत रसुल शेख- पोलीस नाईक

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण

विक्रांत बोधे- सहाय्यक पोलीस निरीक्षक, राहुल झुंझुर्डे - पोलीस हवालदार, मौलाली महमंद जाफर शेख- सफाईगार

होमगार्ड-

रफीक महामुद नदाफ होमगार्ड, पंढरपूर पथक स.क्र 2243 प्रशस्तीपत्रक कोव्हिड योध्दा, परशुराम तानाजी कदम- होमगार्ड, कुर्डूवाडी पथक स.क्र 1886.

डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैदयकीय महाविद्यालय सोलापूर

डॉ. एच. बी. प्रसाद- विभाग प्रमुख औषध वैद्यक शास्त्र, हेमांगी लकडे, अमिता भोसले.

उपविभागीय अधिकारी सोलापूर -1- रत्नाकर कांबळे- अव्वल कारकून

जिल्हा परिषद सोलापूर- डॉ. विलास सरवदे, जिल्हा आयुष अधिकारी.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
कोव्हिड योध्दा पुरस्कारार्थी- डॉ. प्रवीण खारे वैद्यकीय अधिकारी, डॉ.संभाजी भोसले - वैद्यकीय अधिकारी , डॉ. अनिरूध्द पिंपळे- जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सोलापूर, डॉ. अशोक ढगे- तालुका आरोग्य अधिकारी बार्शी, डॉ. एकनाथ बोधले तालुका आरोग्य अधिकारी पंढरपूर, डॉ.रामचंद्र मोहिते- तालुका आरोग्य अधिकारी माळशिरस.

सोलापूर महानगरपालिका सोलापूर
बिरुदेव सरवदे ( कोविड नियंत्रण कक्ष, अनिता आकाशी ( आरोग्यसेविका), डॉ.संतोष थिटे ( स्व्याबर, मदर तेरेसा पोलीक्लिनिक), डॉ.संस्कृती वळसंगकर (वैद्यकीय अधिकारी सोरेगाव ना.आ. केंद्र), डॉ.आनंद कांबळे (वैद्यकीय अधिकारी रेल्वे हॉस्पिटल), एम.एल. निकते ( अनुरेखक, नगर अभियंता कार्यालय), डॉ. मंजुषा चाफळकर ( वैद्यकीय अधिकारी दाराशा हॉस्पिटल), डॉ. मंजिरी कुलकर्णी ( वैद्यकीय अधिकारी), डॉ.राजेंद्र घुली ( मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी हॉस्पिटल), डॉ. माणिक गुर्रम (चेअरमन मार्कंडेय हॉस्पिटल), गोविंद घोगरे ( वाहनचालक).

जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर
डॉ. रश्मी राजनाळ ( वैद्यकीय अधिकारी ), डॉ. आनंद वैद्य ( 108 ॲम्ब्युलन्स), डॉ. दत्तात्रय मधुरे ( 108 ॲम्ब्युलन्स), श्रीमती प्रमिला गायकवाड ( नर्स).

जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर
हेमंत निकम- उपविभागीय अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर क्र.1, दीपक शिंदे- उपविभागीय अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर क्र. 2, अभिजीत जाधव- तहसीलदार पुनर्वसन, अमोल कुंभार- तहसीलदार दक्षिण सोलापूर, रवींद्र चव्हाण- तहसीलदार कुळ कायदा, दत्तात्रय मुळे- नायब तहसीलदार गृह शाखा, विशाल बडे- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोलापूर, जगदीश निसाळ, केतन राचमाले महसूल सहाय्यक, अंजना माशाळे महसूल सहाय्यक, सोमनाथ काटे नाईक, मुस्ताक शेख वाहन चालक, अविनाश पाटील टेक्निकल सपोर्ट.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी, खेळाडूंचा सन्मान guardian minister dattatraya bharane
 
Top