कुर्डुवाडी नगरपरिषद,शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रम


कुर्डुवाडी,(राहुल धोका),२७/०१/२०२१ -माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी करण्या साठी दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिन रोजी कुर्डुवाडी नगर परिषद तसेच शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कुर्डूवाडी नगरपरिषद कुर्डुवाडी येथे सकाळी ७:३० वाजता सर्व पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून हरीत शपथ घेण्यात आली. सदर कार्यक्रमास २०० नागरिक उपस्थित होते.


माझी वसुंधरा अभियानांतर्गत ४ जानेवारी ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे ध्वजारोहण झाल्यानंतर हरीत शपथ घेऊन संपन्न झाला सदर कार्यक्रमास बाराशे विद्यार्थी ४०० स्पर्धक, १२०० विध्यार्थी, ३० पदाधिकारी, ७० कर्मचारी, ४० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांना वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. कुर्डूवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे व सर्व सभापती, गटनेते,नगरसेवक, नगरसेविका यांनी वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला.


मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी शहरातील नागरिकांनी कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नवीन वृक्ष लागवड करावे व त्याचे संवर्धन करावे असे आवाहन केले. त्यानंतर कुर्डुवाडी नगरपरिषद,आजाद मैदान युवा मंच व सनराईज फिटनेस अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण व हरित शपथचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास १२५० नागरिक, २० पदाधिकारी, १०० विध्यार्थी व ७० कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास सनराईज फिटनेस अकॅडमी यांचेवतीने ध्वजास अभिवादन करण्या साठी विविध प्रात्यक्षिके करण्यात आली. शारीरक स्वास्थ्य टिकवण्यासाठी वसुंधरेचे संवर्धन करणे अनिवार्य आहे असे मार्गदर्शन करण्यात आले.

 त्यानंतर कुर्डुवाडी नगरपरिषद व टिळक चौक युवा मंच यांचे संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण व हरित शपथचा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमास २५० नागरिक,पदाधिकारी व ७० कर्मचारी उपस्थित होते.

    त्यानंतर कुर्डुवाडी नगरपरिषद व गांधी चौक युवा मंच यांचे संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण व हरित शपथचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास १६० नागरिक, पदाधिकारी व  ७० कर्मचारी उपस्थित होते.


     यानंतर कुर्डुवाडी नगरपरिषद व एनसीसीचे विध्यार्थी यांचे संयुक्त विद्यमाने हरित सेना अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम व हरित शपथ चा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात १५०० भारतीय प्रजातीचे वृक्ष मियावाकी मिनी जंगल पद्धतीने  विविध ठिकाणी हरित क्षेत्र करण्यात वृक्ष लागवड मोहीम घेण्यात आली  व त्यानंतर हरित शपथचा कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमास २० पदाधिकारी ,१२५ एनसी सी विध्यार्थी व ७० कर्मचारी उपस्थित होते.

      सदर कार्यक्रम समीर मुलाणी - नगराध्यक्ष कुर्डूवाडी, धनंजय डिकोळे -शिवसेना जिल्हा प्रमुख,सौ उर्मिला बागल -उपनगराध्यक्ष शिक्षण सभापती,सौ.राधिका धायगुडे-आरोग्य व महिला बालकल्याण सभापती,बबन बागल- गटनेते बांधकाम सभापती,सौ.दमयंती सोनवर -पाणी पुरवठा सभापती,संजय गोरे -पक्षनेते स्वा.आघाडी,निवृत्ती गोरे, चंद्रकांत वाघमारे,निवृत्ती गोरे -पक्षनेते स्वा.आघाडी,नितीन पवार,सौ.नंदा चंद्रकांत वाघमारे,बाबा साळवे,आयुब मुलाणी सर, आनंद टोणपे,अरुण काकडे,सागर चौधरी,संभाजी सातव, शहनाज मुलाणी,कुमार गव्हाणे-माजी शहर प्रमुख, स्वच्छता दूत तुकाराम पायगण-आरोग्य निरिक्षक,अतुल शिंदे ,रविंद्र भांबुरे आदि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कुर्डूवाडी नगरपरिषदेत हरित शपथ
green oath in Kurduwadi muncipal occasion of republic day
 
Top