अजूनही धर्मांध अतिरेक्यांचा ज्वालामुखी जिवंत आहे ..............

३० जानेवारी १९४८ 
आकाश देखील शरमिंदे झाले
एका शांतिदुताचा 
अहिंसावादी सत्याग्रही महात्म्याचा 
एका माथेफिरूने  प्रार्थनास्थळी 
निर्घृण निर्दयीपणे हत्या केली
"हे राम" पुटपुटत या देवदूताने प्राण सोडले 
तो होता या युगातील थोर महात्मा 
मोहनचंद करमचंद गांधी होता !
संपूर्ण विश्व हादरून गेले,देश हेलावून गेला 
तो निर्दयी खुनी होता नथुराम गोडसे !!
धर्मांध,जातीयवादी विषारी 
लावारसाचा ज्वालामुखी!
ज्या भूमीने विश्वाला अहिंसा सत्य मानवतेचा 
संदेश देणारा महात्मा दिला त्याच भूमीत
महात्म्यास गोळ्या घालणारा निपजला हे 
सत्य कोण नाकारेल ?
बरोबर ७९ वर्षांनी उत्तर प्रदेशमध्ये 
सनातन्यानी पुन्हा एकवार महात्मा गांधी 
यांच्या पुतळ्यास तथाकथित 
साध्वीच्या हस्ते खुलेआम वाजत गाजत
गोळ्या घातल्या
नथुराम गोडसेचा जयजयकार केला 
नथुराम हुतात्मा घोषित केलं
निर्घृण संतापजनक
अमानुष विकृत प्रवृत्तिचा लाव्हारस 
अनुभवता विश्व पुन्हां एकवार हादरून गेलं
धर्मांध जातीयवादी ज्वालामुखी 
अजूनही जिवंत आहे साक्ष देऊन गेला
भारत पुन्हा एकदा कलंकित झाला 
तेच ते आता पिसाळलेल्या जनावरांप्रमाणे पिसाळुंन दिसेल त्याचा जमेल तसा
काटा काढत आहेत
ते एवढे निर्लज्ज निरढावलेले आहेत
संविधान कायदा यांना सुरुंग लावत आहेत
जिथे जिथे त्यांना शक्य आहे तिथे तिथे
नंगानाच घालत आहेत
बॉंबस्फोट खटल्यात ते जामीनावर सुटून
आम्ही निरपराध आहोत असं मिरवत आहेत
आता तर ते मेंदूतील विकृत आग शमवण्यासाठी
महात्म्याच्या सैनिकांना गोळीने टिपत आहेत
त्याहीपुढे जाऊन ते पुतळ्याला 
गोळ्या घालत आहेत
सत्ता तोंडावर बोट ठेवून आहे
या दोन ओळीतील आशय सर्वाना समजतो
हे खरे नाही का ?

आनंद कोठडीया,९४०४६९२२०० 
Top