संकल्प ,नव्या वर्षाचे....

नव्या वर्षाचे नवे पर्व
विसर्जित करावा आपुला गर्व !!

कर्तुत्वाची धरावी वाट
तीच वाढवेल तुमचा थाट !!

होवू नये फुकटच मोठं
ते कायमच असत खोटं !!

धरावी सत्याची कास
तिथेच मिळेल यशाचा घास !!

नको करावया लोक निंदा
होवू नये कोणा मिंदा !!

नव्या वर्षात नवा संकल्प
नको मनी कसलाही विकल्प !!


चारोळ्यांच्या वनांत ....

वळू म्हणाला गाईला "द्या सोडचिठ्ठी आम्हांला
थोडंच आयुष्य उरलं आहे जगायला"
गाय उत्तरली "सोडचिठ्ठीची गरज नाही
दुष्काळ आहे सोबतीला
मरण आहे उशाला ,मग नांदायच कशाला!!

२ सत्तेत चारित्र्याचीच पोकळ हवा
जाईल तिथे फक्त भ्रष्टाचार्यांचाच थवा
देईल त्यांचेच काम एवढेच लक्षात ठेवा !!

३ सरकारी तिजोरी
पाण्यासारखा पैसा वाहतो आहे 
जो तो मिळेल तसा हात धुतो आहे 
दुष्काळ व सुकाळ असो 
मिळेल तिथे संधीसाधू चरतो आहे "!!

आनंद कोठडीया,जेऊर 
९४०४६९२२००


गोफणगुंडा - संकल्प,नव्या वर्षाचे.... चारोळ्यांच्या वनांत 
Sankalp, navin varshache .... in forest of Charolais ....
 
Top