अहो कारभारी....

अहो देशाच कारभारी
तुम्ही लय भारी
पर उलीस ध्यानात घ्या
डोळ असून आंधळ होऊ नका
समजतं असून दुर्लक्ष करू नगा
माझंच खरं हट्ट सोडून द्या
शेतकरी तुमचं इरोधक नायत
तेच हायत अन्नदाता ,
पोशिंदा समद्या जगाच
पर दोन महिने झालं
समंदी रस्त्यावर हायती
हे बरं नव्ह, जर वणवा पेटला तर
काय पण खरं नव्ह थोडंस एक पाऊल मागं घ्या
अन न्याय द्या एवढंच मागणं सत्तेला
लय ताणू नका अन्नदात्याला
मारू नका कारभारी
उलीस ध्यानात घ्या लय सांगणं बरं नव्ह !!

चावडीवरील चिमटा ....

शेतकरी जागा सोडून जाईना
कारभारी हतबल
आंदोलन गुंजभर देखील तुटेना
अक्कलवंत ज्ञानवंत पडलं थंड
शेतकरी ठरत आहेत जिद्दीचे
कारभारी ठरले रद्दीचे.....

आनंद कोठडीया,जेऊर
९४०५६९२२००


 
Top