जरा चालवा की टकूर .......
देशसेवेला निमंत्रण हवे कशाला
श्रमदानास मानधन पाहिजे कशाला !!
सुसंस्कृत वागण्यास वेळ कशाला
दुसऱ्याना नांव ठेवायची कशाला!!
हिशोब आपला ठेवण्यास कायदा कशाला
पारदर्शक असेल तर भीती कशाला !!
आपलं उत्पन्न झाकून कशाला
तपशील देण्यास उशीर कशाला !!
जमाखर्च आयुष्याचा मांडणार् केंव्हा
चारित्र्याला गौरवशाली करणार केंव्हा !!
टकुऱ्यात ठेवावं अस कांही .....
"जिथे कमकुवत मती
तिथे कशी असेल गती !!
जिथे नाही नीती
तिथे कशी असेल प्रगती !!
जिथे चालते अति
तिथे फक्त अधोगती !!
जिथे नाही ध्यास
तिथे कोठून येईल घास !!
जिथे नाही माया
तिथे कशी लाभेल छाया !!
जिथे नाही घाम
तिथे कसा मिळेल दाम !!
जिथे प्रामाणिकपणावर अप्पत्ती
तिथे कशी टिकेल संपत्ती !!
जिथे नाही श्रम
तिथे कसा असेल क्रम !!
जिथे नाही शिक्षण
तिथे अंधश्रद्धा विलक्षण !!
जिथे लोपतो शिष्टाचार
तिथे चालतो भ्रष्टाचार !!
जिथे नाही ज्ञान
तिथे कसे असेल विज्ञान !!
आनंद कोठडीया , जेऊर - ९४०४६९२२००