बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी 13.10 कोटींच्या निधीला तत्वता मान्यता - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

     शेळवे,(संभाजी वाघुले)- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्या साठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील नादुरूस्त बंधाऱ्याबाबत बैठक

जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधारे दुरूस्ती बाबत बैठक घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते.त्यानुसार आज पुणे येथील विधानभवन येथे श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील नादुरूस्त बंधाऱ्याबाबत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शहाजीबापू पाटील,आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन.मुंडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

        बंधारे दुरूस्तीसाठी 13.10 कोटींचा प्रस्ताव पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सादर केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावाला तत्वता मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी देऊन नादुरूस्त बंधारे दुरूस्त करण्याचे आदेश दिले.

      श्री.भरणे यांनी नादुरूस्त बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरूस्त न झाल्यास सर्व पाणी वाहून जाईल. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी राहणार नाही,असे श्री.पवार यांच्या निदर्शनाला आणून दिले.

बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी निधीला तत्वता मान्यता -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बैठकीत निर्णय fund approval for repair of dams- dcm ajit pawar
 
Top