शिबिरात दहा रुग्णांच्या मोतीबिंदु,काचबिंदुवर मोफत शस्त्रक्रिया


कुर्डुवाडी ,(राहुल धोका)- माढा तालुक्याचे युवा नेते पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधत्व निवारण बहुद्देशीय संस्था, सोलापूर व आदित्य आय क्लिनिक लेजर्स सेंटर,डॉ.व्यंकटेश बोगा, सोलापूर यांच्याकडून उपळाई बु.येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन दि २३ रोजी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे माढा तालुकाध्यक्ष संदीप गोरे यांनी केले.


       या शिबिरामध्ये १५० लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोतीबिंदु,काचबिंदु अशा १० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.गरजूंना अल्पदरात चष्मा वाटपही करण्यात आले.

         यावेळी उपस्थित मनोज गायकवाड,संदीप गोरे, संजय नागटिळक,सुधीर गायकवाड,प्रमोद वाकडे,विकास बेडगे, डॉ.धनेश माळी,अविनाश तिपे, अजिनाथ तिपे,किरण दसंगे, सचिन बेडगे,संतोष रोमन,अक्षय गोरे आदी उपस्थित होते.

उपळाई(बु) येथे धनराज शिंदे वाढदिवसा निमित्त मोफत डोळे तपासणी
free eye check up on dhanraj shindes birthday at upalai (bu)
 
Top