ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट 

मुंबई,दि.१९/०१/२०२१ - राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून ४ हजारपेक्षा अधिक सदस्य रिपाइंचे निवडून आले आहेत. ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट आहे.अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपशी युती करून रिपाइंने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आहे.राज्यात भाजप आणि आरपीआयला ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केला आहे .निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्ष पणे काम करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ४ हजारहुन अधिक सदस्य रिपब्लिकन पक्षाचे

राज्यात १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अंदाजे १०० ग्रामपंचायती वर निळा झेंडा फडकला असून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ४ हजारहुन अधिक सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत,अशी माहिती रिपाइंचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविल्या असून येथील अक्कलकोट तालुक्यातील गावात रिपाइंने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे.

निवडणुकीतील वाद विसरून एकदिलाने गावाच्या विकासासाठी काम करावे -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 
forget election controversy and work for development of village with one heart - union minister of state ramdas athawale
 
Top