धाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते केले ध्वजारोहण


      धाराशिव,२६/०१/२०२१ - समानतेचे तत्व शिकविणारा आपला प्रजासत्ताक दिन ऊसतोडणी कामगारच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .


    धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी उस्मानबाद युनिट१ येथे अभिनव पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. सामान्यत: परिसरातील अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करताना अत्यंत आनंद झाला. साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर हा अती महत्त्वाचा असतो हा संदेश जसा दिला गेला तसेच सर्व जण समान असतात हा संदेश देण्यात आम्ही यशस्वी ठरलो असे कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितले .

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व आधिकारी वर्ग, कर्मचारी उपस्थित होते.

धाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते केले ध्वजारोहण 
flag hoisting at dharashiv sugar factory by cutting workers 
 
Top