त्या ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन.२००० रुपये प्रमाणे बँकेत जमा

पंढरपूर प्रतिनिधी दि.०१/०१/२०२१- सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी, चालु गळीत हंगाम २०२०-२०२१ हा सुरु झालेला असून ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दि.१६/१२/२०२० ते दि.३१/१२/२०२० या पंधरवड्यामध्ये ऊस पुरवठा केला आहे त्या ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन.२०००/- रुपये प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक शाखा पंढरपूर येथे जमा केलेला आहेत.

बँकेत खाते नसणाऱ्या शेतकऱ्यांनी खाते उघडुन बिले घ्यावीत

चालु गळीत हंगामात आमचे कारखान्याकडे बिगर अँडव्हान्स ऊस तोडणी वाहतुक करणाऱ्या वाहतुक कंत्राटदार यांना वाहतुक बिलावर ३० % व तोडणी बिलावर १९ % प्रमाणे कमिशन बिले विना कपात दररोज ऊसाची खेप झालेनंतर चेकने कारखाना साईटवर अदा केलेली आहे. तरी शेती विभागातील चिटबॉय यांचेकडून ऊस बिल पावती मिळाल्यानंतर आपली बिले घेण्यासाठी निशिगंधा सह.बँक लि,पंढरपूर यांचेकडे बँकेच्या सुट्या व्यतिरिक्त बँकेतून कारखान्याचे चिटबॉय यांचे कडून बिल पावती घेऊन बिले घेऊन जावीत. बँकेत खाते नसणाऱ्या शेतकऱ्यांनी खाते उघडुन बिले घ्यावीत. त्यासाठी केवायसी कागदपत्रे घेऊन बँकेत जावे. कारखान्याचे ऊस पुरवठा सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी सांगितले.


सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा - कार्यकारी संचालक समाधान काळे 
first installment of sitaram maharaj sugar factory as per mt 2000 / - deposited in the bank - 
executive director samadhan kale 


 
Top