वाहन चालक वाहन जागीच थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला

      पंढरपूर,११/०१/२०२१-पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे एक वाहन तावशी येथील माण नदी पात्रातून वाळू चोरुन काढत असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर,पोलीस कॉन्स्टेबल गणेश बाबर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ नरळे,चालक पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमारे यांचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. दिनांक ११/०१/२०२१ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सिद्धेवाडी, तालुका पंढरपूर गावचे शिवारात विठाई कृषी केंद्राजवळ नेमलेले पोलीस पथक आले असता त्यांना कॅनॉलजवळील रोडवर एक संशयित वाहन येताना दिसले. सदर वाहनास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता वाहनातील चालकाने पोलीस असल्याची चाहूल लागताच वाहन जागीच थांबवून अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून पळून गेला आहे.

बिगर नंबरच्या वाहनाचा चेसी नंबरवरून मालकाचा शोध

      त्यावेळी अशोक लेलँड कंपनीचे नवीन बिगर नंबरचे चार चाकी पिकप छोटा हत्ती वाहनाचे मागील हौद्यात अर्धा ब्रास वाळू असल्याचे दिसून आली.त्याची चेसी नंबरवरून वाहनाचा आरटीओ नंबर तपासला असता नवीन वाहनाचा नंबर हा एम एच 13 DQ 0140 असा असून पोलिसांनी गावात व इतरत्र वाहनांची चौकशी केली असता वाहनाच्या चालकाचे नाव सुनील सुभाष सातपुते, राहणार तावशी,तालुका पंढरपूर यांचे असल्याचे समजले.सदरच्या वाहनावर व वाहनचालक सुनील सुभाष सातपुते,राहणार तावशी याचेवर गौण खनिज कायद्यान्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

       सदरची कारवाई ही पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ओलेकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बाबर,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ नरळे,चालक पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमारे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भिमराव गोळे हे करीत आहेत .

बिगर नंबरच्या वाहनांचा मोठया प्रमाणावर अवैध धंदयासाठी वापर

     सध्या बिगर नंबरची वाहने मोठया प्रमाणावर अवैध धंदयासाठी वापरली जात असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 
  
गौण खनिज कायद्यान्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल ,पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याची कारवाई 
filed a case of sand theft under secondary mineral law,action taken by pandharpur taluka police station
 
Top