नेल्सन मंडेला यांनी रंगभेदाविरुद्ध दिलेला लढा हा मानव अधिकाराचा,समतेचा लढा होता - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले     


   मुंबई दि.२७/०१/२०२१ - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध जाति भेदाविरुद्ध दिलेला लढा संपूर्ण जगात मानव मुक्तीचा लढा ठरला.तसाच लढा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न नेल्सन मंडेला यांनी रंगभेदा विरुद्ध दिलेला लढा मानव अधिकाराचा लढा समतेचा लढा ठरला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.हॉटेल सहारा स्टार येथे नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्डचे वितरण ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.


    यावेळी ना.रामदास आठवले Ramdas Athawale यांना नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड समिती आणि अमेरिकेन विद्यापीठातर्फे पीएचडी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी हास्य कलाकार सुनील पाल,मधू कृष्णन, दीपक पटेल,डॉ टांक,हेमंत रणपिसे,रतन अस्वारे,दीपक साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.


      नेल्सन मंडेला आणि नरेंद्र मोदी दोघांच्याही नावाची अद्याक्षरे एन एम आहेत.नेल्सन मंडेला हे जगात प्रभावी महान नेते झाले.नुकतेच जगात एका पाहणी अहवालात असे जाहीर करण्यात आले आहे की जगात सर्वात प्रभावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना जगात पहिला क्रमांकाचा बहुमान मिळाला असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. 

        लॉकडाऊनच्या काळात गरिबांना गरजूंना सर्वाधिक मदत करणारे,संकटात लोकांना लढण्याची हिम्मत देणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ना.रामदास आठवले यांनी भारतात लॉकडाऊन काळात मोठे योगदान दिले असल्याने ना.रामदास आठवले यांचा यावेळी डॉक्टरेट पदवी देऊन भव्य सत्कार करण्यात आल्याची माहिती दीपक पटेल यांनी दिली आहे. 

रंगभेदाविरुद्ध दिलेला लढा हा मानव अधिकाराचा,समतेचा लढा 
fight against apartheid is fight for human rights,for equality
 
Top