दहिगाव उपसा सिंचन योजनेचे थकित विज बिल कृष्णा खोरे महामंडळाकडून जमा,लवकरच रब्बी आवर्तन सुरू होणार -आ.संजयमामा शिंदे

    कुर्डुवाडी,(राहुल धोका),२०/०१/२०२१-करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे ५१ लाख ३२ हजार रुपयांचे वीज बिल आज कृष्णा खोरे महामंडळातर्फे भरण्यात आल्याची माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.
१४ ऑक्टोबर २०२० रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहीगावच्या मुख्य कॅनॉल चे नुकसान झाले होते .कॅनॉल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून आवर्तन सुरू करण्यासाठी सध्या कोणताही अडथळा नाही. तसेच टप्पा दोन कुंभेज पंपगृह येथील चौथा पंप दुरुस्त केल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना प्रथमच १००% क्षमतेने चालेल असा विश्वास कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उपअभियंता सी.ए.पाटील यांनी व्यक्त केला.
       वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे रब्बी आवर्तन तात्काळ सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यापूर्वीही आ.संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कृष्णा खोरे महामंडळा कडून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे १ कोटी २३ लाख विज बिल जमा केलेले आहे.२०२० मधील उन्हाळी आवर्तनाचे विज बिल ५१ लाख ३२ हजार नुकतेच जमा केल्यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे थकित विज बिल कृष्णा खोरे महामंडळाकडून जमा exhausted electricity bill of dahigaon upsa irrigation scheme collected from krishna valley corporation 
 
Top