माढा तालुक्यात डाॅ अविनाश पोळ यांची भेट,पाणी फाउंडेशन कार्यकत्यात उत्साह संचारला


     कुर्डुवाडी/(राहुल धोका) - पानी फाउंडेशन अंतर्गत समृध्द गाव स्पर्धेच्या निमित्ताने आनंदयात्री डॉ. अविनाश पोळ,जिल्हा समन्वयक पानी फाउंडेशन सत्यवान देशमुख,सुशांत गायकवाड ,माढा तालुका समन्वयक यांनी मानेगाव येथे भेट देऊन झालेल्या कामाची पाहणी केली. डॉ.पोळ यांनी भाषण न देता गावकऱ्यांशी संवाद साधत जलव्यवस्थापन, जल संधारण,मृदसंधारण,वृक्ष व जंगलांची वाढ ,मातीचे आरोग्य, पौष्टीक गवताचे कुरण,कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे,सेंद्रिय शेती, शोषखडयाचे महत्व, ग्रामपंचायत व रोहयोमधील विविध योजना तसेच गावातील राजकारणाचा विकासावर होणारा विपरित परिणाम आदि विषयावर संवाद साधत डॉ अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन केले.

पर्यावरणीयदृष्ट्या गाव समृद्ध होणे हा विकासाचा पाया

     पर्यावरणीयदृष्ट्या गाव समृद्ध होणे,वृक्ष लागवड संवर्धन, पाण्याची पातळी वाढवणे हा गावाच्या विकासाचा पाया आहे. पाऊस किती पडला याचे मोजमाप करावे,जमिनीच्या पोटात किती पाणी आहे,शिवारातील सर्व विहिरींची पाणी पातळी दर महिन्याला मोजली म्हणजे आपल्या भूगर्भातील पाण्याची पातळी समजून येइल.कमीत कमी पाण्यावर पिके घेतली पाहिजेत.पाणी बचतीसाठी मल्चींग,ठिबक सिंचन वापर करावा. शेतातील पालापाचोळा,पाचट पेटवून देऊ नये,सूक्ष्म जैव विविधता नष्ट होते ,जमिनीतील गांडूळ ,सहस्त्र पाद नामशेष होतात.पूर्वी गांडूळ जमीन भुसभुशीत सच्छिद्र करत त्यामुळे जमिनीत पाणी मुरत असे. लाकडी नांगरणे नांगरट अशा विविध विषयावर मार्गदर्शक केले .


        डॉ.पोळ यांनी मांडलेल्या विचाराने व कर्तृत्वाने ग्रामस्थ भारावून गेले होते.सत्यवान देशमुख,सुशांत गायकवाड यांनी स्पर्धेदरम्यान गाव समृद्ध होण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले.

   महिला बचतगटाच्या माध्यमातून गावात जनजागृती व पानी फाउंडेशन कामात योगदान दिल्याबद्दल सौ.प्रमोदिनी लांडगे यांचा सत्कार त्यांच्या सासुबाई सौ.अंजना गोरख लांडगे व डॉ.पोळ यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.पोळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलां व पुरुषांना जांभळीच्या रोपटयांचे वाटप करण्यात आले. ही सर्व रोपे आनंद दिगंबर देशमुख यांनी मोफत उपलब्ध करून दिली होती. 

     यावेळी शिंदे सर,नाना काका देशमुख,नेताजी लांडगे,संजय देशमुख,निरंजन देशमुख,सुशील पारडे,बाबा पारडे,सुब्राव राऊत,प्रमोदिनी लांडगे, सुहास लांडगे, विश्वजित पाटीलसह माता भगिनी आबाल वृध्द उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रदिप जाधव गुरुजी यांनी केले.

पर्यावरणीयदृष्ट्या गाव समृद्ध होणे हा गावाच्या विकासाचा पाया- डाॅ अविनाश पोळ environmentally prosperous village is foundation of village development
 
Top