माणसांनी स्वतःचा स्वार्थ अधिक पाहिल्यामुळे विविध आजारांची निर्मिती

पंढरपूर,१२/०१/२०२१,(प्रतिनिधी)-पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणाचे संरक्षण आपण केले तरच आपले संरक्षण होवू शकते.हवा,पाणी,ध्वनी, जमीन आदी घटकांचे आपण प्रदूषण होण्यापासून रोखले पाहिजे. पृथ्वीला आपण जननी म्हणतो तिचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. माणसांनी स्वतःचा स्वार्थ अधिक पाहिल्यामुळे विविध आजारांची निर्मिती झाल्याचे दिसते. माणसांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी पर्यावरण रक्षण झाले पाहिजे” असे प्रतिपादन अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे यांनी केले.

         राष्ट्रीय युवक दिन व वसुंधरा दिन साजरा

        रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘राष्ट्रीय युवक दिन’ व ‘वसुंधरा दिन’ याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणासाठी हरित शपथ दिली.

पर्यावरणाचे सातत्यपूर्ण संरक्षण केले तर मानवी जीवन सुखी समृद्ध होईल

          यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,सध्या जागतिक स्तरावर कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सरकारने संचारबंदी लागू केली.या काळात जग भरातील वाहतुक मंदावली.हवा प्रदूषण रोखले गेले. त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. पर्यावरणाचे सातत्यपूर्ण संरक्षण केले तर मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होईल. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपण वसुंधरेचे संरक्षण केले पाहिजे.

         या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे,स्वायत्त विभाग समन्वयक डॉ. मधुकर जडल, सांस्कृतिक समिती विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे तसेच सिनिअर,जुनिअर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रा.दादासाहेब हाके यांनी मानले.

    माणसांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी पर्यावरण संरक्षण महत्वाचे - प्रो.डॉ.तानाजी लोखंडे 
  environmental protection important for healthy,longevity of human beings - prof.dr.tanaji lokhande
 
Top