पंढरपूर नगरपरिषदेच्या विविध समितीच्या सभापती निवडी

      पंढरपूर, ०६/०१/२०२१ -पंढरपूर नगरपरिषदेच्या विविध समितीच्या मुदत संपल्याने आज नगरपालिकेच्या सभागृहां मध्ये पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिपत्याखाली विविध समितीच्या सभापतींची निवड व समिती सदस्यांची निवड करण्यात आली.

       यावेळी भाजप,पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी गटनेते अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर व तीर्थक्षेत्र विकास आघाडी व काँग्रेसचे गटनेते सुधीर धोत्रे,सुरेश नेहतराव यांनी समितीच्या सदस्य व सभापती निवडीबाबतचे पत्र पीठासीन अधिकारी यांच्याकडे सादर केले.

   यावेळी बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुरेश वसंत नेहतराव व पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी संजय चंद्रकांत निंबाळकर,आरोग्य समितीच्या सभापतीपदी विक्रम लक्ष्मण शिरसट, शिक्षण समितीच्या सभापतीपदी शकुंतला विजय नडगिरे, महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदी मालन भगवान देवमारे ,उपसभापती पदी भाग्यश्री देवेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.

     नियोजन व विकास समितीच्या सदस्यपदांची निवड करण्यात आली तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी नगराध्यक्ष दगडु नारायण धोत्रे, अक्षय प्रताप गंगेकर व प्रशांत गणपत शिंदे यांची निवड करण्यात आली.

      ही निवडणूक पार पाडणेकामी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर ,सभा लिपिक लक्ष्मीकांत कोटगिरी यांनी काम पाहिले.

      यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,वामन बंदपट्टे व सर्व नगरसेवक हजर होते.

पंढरपूर नगरपरिषदेच्या विविध समितीच्या सभापती निवडी 
election of chairman of various committees of pandharpur municipal council
 
Top