कर्तव्य आणि कृतज्ञता म्हणजे संजय डिकोळे - डाॅ.प्रा.राजेंद्र दास

कुर्डुवाडी,(राहुल धोका)- कर्तव्य आणि कृतज्ञता म्हणजे संजय दादा डिकोळे. सध्याच्या काळात माणसातील माणुसकी संपत चाललेली असताना असा सेवानिवृत्त सत्कार फक्त माणसातल्या माणसाचा होतो. यापुढील काळात सेवानिवृत्ती सत्कार होतील असे मला वाटत नाही कारण शासनाचे धोरण हे केवळ टेंडर स्वरूपाचे आहे, त्यामुळे हा सोहळा आगळा वेगळा आहे. संजय दादा हा कामावर व काम करणार्‍यावर प्रेम करणारा प्रेमळ माणूस असल्याचे उदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र दास यांनी संजयदादा डिकोळे यांच्या आयोजिलेल्या निवृत्ति सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात काढले .

सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील हा त्यांचा उदय

यावेळी‌ विविध मान्यवरांची गैरवापर भाषणे झाली. डॉ.विलास मेहता यांनी या कार्यक्रमासाठी लावलेले बोर्ड मला मान्य नसून दादा डिकोळे हे जरी कर्मचारी म्हणून निवृत्त होत असले तरी सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील हा त्यांचा उदय असून त्यांचे नेतृत्व या क्षेत्राला लाभणार आहे असे गौरव उदगार काढले. आंतरभारती प्रशालेतील ३८ वर्ष सेवा करून निवृत्तीनिमित्त येथील श्री गणेश कार्यालय येथे संजयदादा डिकोळेंचा सपत्नीक सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

शिस्त व निर्व्यसनी ठेवण्यासाठी दादा डिकोळे यांची प्रशासकाची भूमिका

अध्यक्षपदावरून बोलताना माजी नगराध्यक्ष दिनेश कदम म्हणाले की, शालेय विद्यार्थी व शिक्षकांना शिस्त व निर्व्यसनी ठेवण्यासाठी दादा डिकोळे यांनी प्रशासकाची भूमिका बजावली .

डाॅ जयंत करंदिकर यांनी डिकोळे परिवाराचे कार्याविषयी माहिती दिली.यावेळी अनेक निवृत्त शिक्षकांनी त्यांचे अनुभव कथन केले.

राजकारणापलीकडे जाऊन सर्वांशी चांगली मैत्रीसंबंध


      आमदार संजयमामा शिंदे यांनी आपल्या भाषणात दादा डिकोळे यांनी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांशी चांगली मैत्रीसंबंध ठेवले. आज सेवा निवृत्तीच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आले आहेत, नाही तर सध्याच्या कालखंडात हे शक्य नसल्याचे सांगितले.

         यावेळी जनता बँकेचे अध्यक्ष अर्जुन बागल,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे , उपनगराध्यक्ष उर्मिला बागल , नगराध्यक्ष समिर मुलाणी ,प्रकाश शहा, अजित पवार ,अशोक ढेपे , चंदुकाका शेंडे ,गणेश शिंदे, महेश गांधी,दत्ता काकडे, सुरेश बागल,रवींद्र ठाकडे,रंजीत शिनगारे,अँड प्रमोद पलसे, शंकर सुतार,सुहास शेंडे, राजेश गांधी, चेतन शहा, फुलचंद धोका,नवनाथ बागल, दयानंद पवार,चंद्रकांत वाघमारे, युसूफ दाळवाले, चंदुलाल म्हमाणे ,रवी भांबुरे,मनोज धायगुडे, दादा गोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कर्तव्य आणि कृतज्ञता म्हणजे संजय डिकोळे - डाॅ.प्रा.राजेंद्र दास duty and gratitude is sanjay dikole - dr.prof.rajendra das
 
Top