पुणे - दौंड शटल सेवा सुरू करण्यासंदर्भात परवानगी मिळण्याबाबत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची मदत व पुनर्वसन सचिव श्री निंबाळकर यांना सूचना..
पुणे,दि.१४ जाने,२०२१-दौंड ते पुणे प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे येथे राहणे परवडत नसल्याने खाजगी तसेच शासकीय सेवेत काम करणारे नागरिक खूप मोठ्या संख्येने दौंड येथे राहून पुणे येथे नौकरी करत आहेत. दौंड - पुणे शटल सेवा बंद झाल्याने दौंड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी, काही कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर वाहनांनी पुण्याला जाणे परवडत नाही. दक्षिण भारतात जाणाऱ्या सर्व गाड्या सध्या दौंड येथे थांबा असला तरी देखील दौंड येथून प्रवास करणाऱ्या प्रवासांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत नाही. प्रवास केलाच तर भलामोठा दंड रेल्वेकडून आकाराला जात आहे. यामुळे दौंड-पुणे रेल्वे शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडे दौंड प्रवासी संघटना आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे, दौंड तालुकाप्रमुख अनिल सोनवणे यांच्याकडून केली गेली होती.

    याबाबत शटल सेवा सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. शटल सेवा सुरू करण्या बाबत उपसभापती कार्यालयाच्या वतीने याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

शटल रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन तयार

      शटल रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन तयार असून महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन विभागाची परवानगी आवश्यक आहे. यासंदर्भात मुख्य वाणिज्य प्रबंधक श्रीमान प्रभात रंजन यांचे दिनांक १२ जानेवारी २०२१ पत्र क्र. C /301 / Q / Covid -19 दौंड - पुणे रेल्वे सेवा सुरु करणे बाबत रेल रोको आंदोलन दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी करणार असल्या बाबत सचिव आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन, मंत्रालय , मुंबई यांना पत्रा द्वारे विनंती केली आहे कि दौंड - पुणे दरम्यान अनारक्षित रेल्वे सेवा अत्यावश्यक सेवेतील व इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरु करणे बाबत आपले निर्देश दिनांक १७ जानेवारी २०२१ पूर्वी रेल्वे प्रशासनास द्यावेत अश्या आशयाचे पत्र पाठवण्यात आले आहे यास तात्काळ प्रतिसाद देण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी मदत व पुनर्वसन विभागास केली आहे.

सावधगिरी बाळगून परवानगी देण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची सूचना

          कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे तसेच लसीकरण देखील हळूहळू सुरू करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास ८० टक्के सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे सर्व प्रकारचे प्रवासी नियम व प्रवास करताना सावधगिरी बाळगून परवानगी देण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना सदरील पत्राच्या माध्यमातून सूचना केली आहे.

यामुळे दौंड-पुणे रेल्वे शटल सेवा सुरू करावी-ना.डॉ.नीलम गोऱ्हे 
due to this, daund-pune railway shuttle service should be started- dr.neelam gorhe
 
Top