अधिकार्यातील देवमाणुस.... उपजिल्हाधिकारी सचिन ढोले

पंढरपूर,(मारूती भोसले) - येथील ६५ एकरा जवळील नवीन पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातामधील जखमींना पंढरपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी अपघातग्रस्तांचा रक्तस्राव होत असलेला पाहून तात्काळ आपल्या स्वतःच्या गाडीतून सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निमित्ताने गांव दौऱ्यावर आसणारे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले हे दि.१८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे येत असताना पंढरपूर येथील ६५ एकरा जवळील नवीन पुलाजवळ औंढी ता. मोहोळ येथील संजय बचुटे व मनिषा संजय बचुटे हे दुचाकीवरून जात असताना गाडी घसरल्याने पडून जखमी झालेल्या अवस्थेत होते. हे दिसताच तेथून जाणाऱ्या प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी हा कठीण प्रसंग पाहताक्षणी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या गाडीमध्ये दोघां जखमींना गाडीचा चालक रामदास शिवाजी पालक व अंगरक्षक संदीप उदमिले यांच्या मदतीने गाडीत बसवून तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल करून त्या ठिकाणी असणारे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना उपचाराबाबत काळजी घेण्याचे सूचना दिल्या .

      ग्रामपंचायत निवडणूक व मतमोजणीमध्ये सर्व प्रशासन व्यस्त असतानादेखील प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी रोड अपघातातील जखमींना मदत करून सर्वसामान्य जनतेने देखील अपघातग्रस्तांना तातडीने मदतीचा हात दिला पाहिजे हा आदर्श निर्माण केला असून यापुर्वी देखिल पेनूर, पोखरापूर ता.मोहोळ येथेही अशाच अपघात ग्रस्तांना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आपल्या गाडीमध्ये बसवून पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करून सहकार्य केले होते.

    कोरोना महामारी,महापूर काळातसुध्दा गरोदर महिला व लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तिंनासुध्दा प्रसंगावधान राखून दवाखान्यात अनेक ठिकाणी व वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे. 

अधिकार्यातील देवमाणुस.... उपजिल्हाधिकारी सचिन ढोले 
devmanus in the officer ... deputy collector sachin dhole  
 
Top