स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुर्डूवाडी नगरपरिषद येथे पाच घंटागाडीचे लोकार्पण
       कुर्डूवाडी,(राहुल धोका),२३/०१/२०२१ -आज रोजी सकाळी ११ वाजता कुर्डुवाडी नगर परिषद,कुर्डूवाडी येथे स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला,त्यानंतर स्व.हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुर्डूवाडी नगरपरिषदेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन या निधीमधून ३६ लाख रुपये किमतीच्या ५ घंटागाडी आरोग्य सेवेत दाखल झाल्या असून यांचा लोकार्पण सोहळा नगरपरिषद कार्यालय येथे आयोजित करण्यात आला.


      सदर कार्यक्रम समीर मुलाणी (नगराध्यक्ष कुर्डूवाडी), धनंजय डिकोळे (शिवसेना जिल्हा प्रमुख),सौ उर्मिला बागल (उपनगराध्यक्ष,शिक्षण सभापती), सौ राधिका धायगुडे (आरोग्य व महिला बालकल्याण सभापती),बबन बागल (गटनेते बांधकाम सभापती),सौ दमयंती सोनवर (पाणी पुरवठा सभापती),संजय गोरे (पक्षनेते स्वा. आघाडी),निवृत्ती गोरे,नितीन पवार,चंद्रकांत वाघमारे,रमण शेंडगे,कुमार गव्हाणे(माजी शहर प्रमुख),बबलू वाल्मीकी,बाबा साळवे तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका आणि समीर भूमकर (मुख्याधिकारी),अतुल शिंदे (सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक), बाळासाहेब पायगण (आरोग्य निरीक्षक),रवी भांबुरे ,वैशाली मठपती (अभियंता),कोमल वावरे (पाणी पुरवठा अभियंता),अभिजित पवार (शहर अभियंता), विशाल गोरे,संदीप भराटे,हरीश भराटे,नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून शहरातील कचरा समस्यासाठी घंटागाड्याची पूर्तता यामुळे होणार आहे.
 
Top