पंढरपूरात स्व.आ.भारत भालके यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

     पंढरपूर (प्रतिनिधी) -लोकप्रिय आमदार स्व.भारत भालके यांच्या स्मरणार्थ एन.वाय.ग्रुप व मा.नगर सेवक नागेश यादव मित्र परिवार यांच्यावतीने पंढरपूर येथे राज्यस्तरिय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन माजी जि. प.सदस्य व्यंकटराव भालके यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक महादेव धोत्रे,शंकर पवार,संजय घोडके,सागर यादव,किर्तीपाल सर्वगोड,संजय बंदपट्टे,विठ्ठल बंदपट्टे,स्वागत कदम, गुरु दोडिया आदि उपस्थित होते.

       राज्यातील अनेक क्रिकेट संघांचा सहभाग

      आ.स्व.भारत भालके यांच्या स्मरणार्थ येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण येथे राज्य स्तरिय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी राज्या तील कोल्हापूर,सातारा, रायगड,नाशिक,विजापूर (कर्नाटक) सह सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक क्रिकेट संघाने सहभाग नोंदवला आहे.

      या स्पर्धेचे प्रथम परितोषिक एन.वाय.ग्रुपतर्फे १ लाख ५५५ रुपये आणि स्व.भारत(नाना)भालके चषक, द्वितीय परितोषिक युवा नेते सागर यादव यांच्यावतीने ५० हजार ५५५ रुपये आणि चषक, तर तृतीय पारितोषिक नगरसेवक महादेव धोत्रे यांच्यावतीने ३० हजार ५५५ रुपये व चषक विजेत्या संघांना देण्यात येणार आहे.या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दि.२८ जानेवारी रोजी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

      यावेळी ॲड.किशोर खिलारे,भोला साठे,ॲड. बादल यादव,नाथा यादव,पंढरिनाथ कदम,लोकेश यादव,भाऊसाहेब कांबळे,दशरथ यादव,नारायण देवकुळे,राजाभाऊ देवकुळे, प्रदीप यादव,योगेश मोरे,बापू खिलारे,लहू रणदिवे,सुर्यभान वाघमारे, प्रसाद यादव,महेश सातपुते,बबलु शेख तसेच कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूरात स्व.आ.भारत भालके स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा cricket tournament in memory of late bharat bhalke at pandharpur 
 
Top