जैन सोशल ग्रुप सेंट्रलतर्फे केतनभाई शहा कोरोना योध्याने सन्मानित


    सोलापूर -जैन सोशल ग्रुप सेंट्रलची वार्षिक सर्वसाधारण सभा हिप्परगा येथील शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क येथे संपन्न झाली.ह्या सभेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केतनभाई महेंद्रभाई शहा यांना संस्थेतर्फे कोरोनाच्या लॉकडाऊन समयी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प आयोजित करून १४७५ बाटल्या रक्त संकलित करण्या करिता तसेच BJS तर्फे "डॉक्टर आपल्या दारी" या अंतर्गत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अँब्युलन्समध्ये डॉक्टर,पेरामेडिकल स्टाफ व औषधें घेऊन विनामूल्य तपासणी व औषधे देऊन २ महिन्यात सर्व दवाखाने बंद असताना ६००० गरजु रुग्णांना सेवा दिली. गाई व इतर रस्त्यावर फिरणाऱ्या मोठ्या जनावरांना रोज हिरवा चारा , भटक्या कुत्र्यांना दूध व चपाती तसेच पक्ष्यांना दाणापाणी देण्यात येत होते.जखमी जनावरांवर डॉक्टरांसह उपचार करत होते. 

   महानगरपालिकांच्या १० कोविड केअर सेन्टर मध्ये म्युझिक सिस्टम,गरम पाण्यासाठी गिझर देण्यात आले.गरजूंना धान्याचे किट वाटप आणि  शहरातील देहव्यापार करणाऱ्या महिलांच्या घरी जाऊन कर्फुमध्ये धान्य व जीवनावश्यक वस्तू तर जिल्हाधिकारी यांच्याकडे २०० धान्याचे किट देण्यात आले.अशी अनेक कामे सदस्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीने केतनभाई यांनी केली,म्हणून त्यांना त्यांच्या पत्नी ज्योती शहा समवेत सन्मानपत्र देऊन शाल,मोतीमाळा व बुके देऊन अध्यक्ष गौतमभाई संचेती यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले.यावेळी सर्व दाम्पत्य सदस्य उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपाध्यक्ष संजय शहा,सचिवा संतोष बंब,सहसचिव अतुल गांधी, तरंग शहा व खजिनदार अशोक छाजेड यांनी परिश्रम घेतले.

जैन सोशल ग्रुप सेंट्रलतर्फे केतनभाई शहा यांना कोरोना योध्या सन्मानपत्र corona warrior certificate to ketanbhai shah from jain social group central
 
Top