कुर्डुवाडीत वैद्यकीय क्षेत्राचे कोरोना लसीकरण

      कुर्डुवाडी,(राहुल धोका)-कुर्डुवाडी शहरातील मेडिकल स्टाफचे कोरोन लसीकरण माढा आरोग्य केंद्र येथे करण्यात येत आहे . 


     लसीकरणानंतर बोलताना लस अत्यंत सुरक्षित असल्याचा संदेश डॉ प्रसन्न शहा,डॉ पंकज सातव यांनी दिला आहे.सध्या सिरमची कोव्हीशिल्ड ही लस दिली जात असून ही लस सुरक्षित असल्याची माहिती डॉ.प्रसन्न शहा यांनी दिली.या लसीकरणापूर्वी नाव नोंदणी केली गेली होती.यासाठी आधार कार्ड,पँन कार्ड,बँक पास बुक आदी पुरावे घेतले गेले होते.

        लसीकरणानंतर अर्धा तास अंडर आँब्जर्वेशन ठेवण्यात येते.रजिस्ट्रेशनसाठी पाच मिनिट तर लस घेण्यासाठी असे एक मिनिटापेक्षा कमी काळ लागतो असे डॉ पंकज सातव यांनी सांगितले.२८ दिवसानंतर लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येणार असून रोज किमान १०० मेडिकल स्टाफचे लसीकरण चालु आहे. शहरातील कोरोनासाठी काम करणाऱ्या अनेक मेडिकल स्टाफचे लसिकरण झाले असून लस सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण सुरु झाल्यानंतर आपल्या क्रमाणे लस घ्यावी असे आवाहनही डॉ प्रसन्न शहा व डॉ पंकज सातव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे.

कुर्डुवाडीत वैद्यकीय क्षेत्राचे कोरोना लसीकरण corona vaccination of medical field in kurduwadi 
 
Top