नागरिकांच्यावतीने शासनाचे अभिनंदन -डॉ.नीलम गोऱ्हे


           मुंबई , दि.२९/०१/२०२१- शासनाने सर्व नागरिकांना दिवसभराच्या ठराविक वेळेत लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व नागरिकांच्या वतीने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आभार मानले आहेत.

   कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने मुंबईतील सर्व लोकल बंद केल्या होत्या.त्यामुळे कोविड १९ चा प्रसार आटोक्यात येणेंस खूप मदत झाली.

       मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यावर शासनाने अनेक गोष्टी पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. नागरिकांना वैद्यकीय सेवा व उपचारासाठी विविध दवाखान्यात जावे लागते.अनेकांना गंभीर आजार असतानाही दवाखान्यात जाणे शक्य नव्हते. कामकाजही करणे शक्य नव्हते.पण आता सर्वांना ठराविक वेळेत लोकल प्रवास करण्यास परवानगी दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

लोकल प्रवास करण्यास परवानगीबद्दल शासनाचे अभिनंदन - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे 
congratulations to government for allowing local travel -dr.neelam gorhe
 
Top